उपासना चिंतन

150.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book Upasana Chintan

ज्ञान प्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये शेकडो विद्यार्थी प्रशिक्षणासाठी आणि अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी
गेली 30 वर्षे येत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या प्रशासकीय सेवांमध्ये निवड करण्याच्या परीक्षांची तयारी हे
विद्यार्थी करत असतात. त्यांच्या अभ्यासाबरोबरच दर शनिवारी ते एकत्र उपासना करतात. प्रत्येक वेळी उपासनपूर्वी
त्यांच्यासाठी उपासनेत म्हणायच्या मंत्रांचा अर्थ, ते मंत्र निवडण्यामागची पार्श्वभूमी, उपासनेने मनावर होणारा परिणाम,
या विषयीचे चिंतन मांडले जाते. गेल्या 30 वर्षांतील काहीशे चिंतनांपैकी निवडक एकोणीस चिंतनांचा संग्रह या
उपासना चिंतन पुस्तिकेमध्ये केलेला आहे. स्पर्धा परीक्षा केंद्राचे सुरुवातीपासून काम पाहणारे डॉ. विवेकराव कुलकर्णी
व डॉ. सविताताई कुलकर्णी यांनी ही चिंतने मांडलेली आहेत.