३४ व्या वर्षात पदार्पण
छापील मासिक हातात घेऊन वाचण्याचा आनंद काही औरच!
इ. 5 वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून प्रकाशित होणारे विद्यार्थीप्रिय मासिक!
वर्षभरात तीन विशेषांकांसह रंगीत मुखपृष्ठ, आकर्षक छपाईचे 12 अंक, सुमारे 400 पाने!
हजारो घरांमध्ये पोहोचणारा वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक सोबत कल्पक कलाकृतीही
प्रत्येक अंकात कथा, कविता, ललित लेख इ. साहित्याचा समावेश
व्यक्तिविकसनपर लेख, लेखमाला व प्रेरणादायी कहाण्या
विज्ञान-तंत्रज्ञान, कला-क्रीडा यांवर माहितीपर लेख
अभ्यासपूरक, भटकंतीपर, सद्य घडामोडींवर आधारित लेख
अभिव्यक्तीला, कल्पकतेला संधी देणारे कृतिपाठ
कल्पक कलाकृती, विज्ञान प्रयोग, भाषिक खेळ, शब्दकोडी, तार्किक कोडी, गणिती कोडी, विनोद आणि बरेच काही
प्रत्येक अंकात स्फूर्तिगीत, पानांखाली माहितीपर ओळी
अंकातील काही लेखांना QR code द्वारा दृक्श्राव्य क्लिप्स्ची जोड
सभासदांसाठी विविध स्पर्धा, उपक्रम, मेळावे,कार्यशाळा….
दिवाळी अंक वितरण खर्च अतिरिक्त
छात्र प्रबोधन नित्य मासिक
₹400.00
अंकाची झलक पाहा See a snippet of the bookसौर पौष_जानेवारी २६ अंक झलक
खात्रीशीर वितरण पर्याय
दरमहा छात्र प्रबोधनचा अंक सर्व सभासदांना पोस्टाने पाठवला जातो; पण दुर्दैवाने तो सर्वांना खात्रीशीरपणे मिळतोच असे नाही. त्याबाबतच्या अनेक तक्रारी गेले वर्षभर येत होत्या. पोस्टातही त्याबाबत आम्ही पाठपुरावा केला; पण त्याचा म्हणावा तितका उपयोग झाल्याचे दिसत नाही. म्हणून Speed Post अथवा Registered AD ने खात्रीशीर अंक पाठविण्यासाठी पर्याय सुरू करत आहोत. याचा पूर्ण खर्च छात्र प्रबोधनला उचलता येणार नाही म्हणून ज्यांना पोस्टाद्वारे नियमितपणे अंक मिळत नाहीत, त्यांनी हा खात्रीशीर वितरणाचा पर्याय निवडावा. वितरण खर्च रु. 300/- (वर्गणी शिवायचा).
मूळ ४०० रुपये वर्गणीचा पर्याय देखील उपलब्ध आहे पण पोस्टाद्वारे खात्रीने अंक मिळू शकेल याची ग्वाही आम्ही देऊ शकत नाही.


