लेखिका – मीरा बडवे
प्रथम आवृत्ती – जून २०२५
पृष्ठसंख्या – २६४/-
₹300.00 ₹250.00
आपल्या समाजातील यशस्वी ’अंध तरुणांचं’ एक विश्व या पुस्तकातील कथांच्या माध्यमातून उलगडत जाणार आहे.
अपार इच्छाशक्ती आणि’ निवांत अंध मुक्त विकासालया’ सारखं त्यांचं कुटुंब यांच्या मदतीनं त्यांनी आपल्याला अचंबित करणाऱ्या या यशोगाथा लिहिल्या.
आपल्या कल्पनाशक्तीपलीकडील क्षेत्रात यशाची क्षितिजं रचणाऱ्या या लढवैय्यांनी जीवनाशी दोन हात करतांना मान झुकवली नाही – हारही मानली
नाही. सहानुभूतीच्या भारानं या कथा वाकलेल्या नाहीत. राखेतून नित्य जन्मणाऱ्या फिनिक्स पक्ष्यांच्या या कथा.
त्यांच्या जीवनातल्या प्रकाश किरणांचं हे पुस्तक म्हणजे डोळस व प्रांजळ चित्रण आहे.
खेड्यापाड्यातल्या, वाड्यावस्तीवरल्या अनेक अंध मुलांची आयुष्यं वाचवण्याचा प्रयत्न करणं हीच या कथांमागील प्रेरणा.