चिरवसंत स्मृतिवन (*)

200.00

ज्ञान प्रबोधिनीशी सायुज्य पावलेले ज्ञान प्रबोधिनीचे द्वितीय संचालक डॉ. वसंत सीताराम तथा आण्णा ताम्हनकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या आयुष्याचा पट उलगडणाऱ्या अनेकांच्या आठवणींचा हा ग्रंथ.

आपल्या ८४ वर्षांच्या जीवनकाळात त्यांनी घेतलेल्या अनुभवांची विविधता, अशक्य वाटणाऱ्या परंतु त्यांनी शक्य केलेल्या पुरुषार्थाच्या कहाण्या, अनेक प्रकारचे विचारप्रवाह समजून घेत, व्यापक अशा राष्ट्रीय – आध्यात्मिक धारणेपर्यंत झालेला त्यांचा प्रवास, त्यांच्या जीवन आणि कार्याच्या प्रवासात त्यांना भेटलेल्या अलौकिक व्यक्ती, सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांकडून त्यांना लाभलेलं विलक्षण प्रेम आणि त्यांनीही हजारो जणांना दिलेलं निर्व्याज प्रेम, असा सर्व पट अनेकांच्या आठवणींमधून आपल्यापर्यंत पोहोचविणारा आणि देशाकार्यार्थ कर्तृत्वाची प्रेरणा वाढविणारा ग्रंथ!