झेप क्षितिजापलीकडे

350.00

पुस्तकाची झलक पाहा – Pages.pdf

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी
मना सज्जना हेचि क्रिया धरावी
मना चंदनाचे परी त्वा झिजावे
परी अंतरीं सज्जना नीववावे

या संत रामदासांच्या श्लोकाप्रमाणे आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या प्रचारासाठी, वंचित मुलांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी चहुबाजुंनी केलेली धडपड आणि एका फिनिक्स पक्षाप्रमाणे शिक्षणरूपी पंखानी घेतलेली कै. दत्तात्रय गजानन सांयगावकर उर्फ दत्ता काका यांनी घेतलेली झेप व त्याचा प्रेरणादायी प्रवास पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशनने झेप क्षितिजापलीकडे या पुस्तकाची निर्मिती केली आहे. दत्ताकाका यांनी त्यांच्या आयुष्यात यश संपादन करत असताना इतरांच्या प्रगतीचा नेहमी विचार केला, कोणत्याही कारणामुळे मुलांची शिक्षणाची दारे बंद होऊ नयेत यासाठी समाजाचे देणे म्हणून मुलांना मदत केली, त्यांचा हा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. प्रसिद्ध लेखिका डॉ.चित्रलेखा पुरंदरे यांनी दत्ता काका यांचा जीवनप्रवास लिहण्यासाठी दत्ताकाकांच्या आयुष्याचा खूप जवळून अभ्यास केला आणि तो प्रवास,त्यांची मुलं, नातवंड, नातेवाईक, मित्र मंडळी, अनेक शिक्षणतज्ज्ञ यांच्या भेटीगाठी घेऊन या जीवनप्रवासाची माळ सुंदरपणे गुंफली आहे.

सूचना: या पुस्तकाचे सर्व उत्पन्न सायगांवकर फौंडेशन मध्ये जमा करण्यात येईल.