तू मोठ्ठा कधी रे झालास

110.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book

 

बालवयातलं आपलं इवलंसं विश्व कधी आणि कसं विस्तारत जातं, आपल्यालाही कळत नाही. भातुकली बाजूला सारून शाळा, मित्र परिवार, शेजार आणि दिवसभरात भेटणाऱ्या अनेकांशी आपला क्रिया प्रतिक्रियांचा खेळ सुरू होतो. अनुभवांना आपण भिडत असतो. निरीक्षणातूनही सहजपणाने ‘समज’ येण्याचे खूपसे धागे हाती लागतात.
या साऱ्या भवतालातून, वडिलधाऱ्यांच्या नजरेने योग्य-अयोग्य, चांगलं-वाईटाची समजूत पटतापटता स्वत:ची ‘नजरही’ तयार होऊ लागते. आपली मतं, आपली आवड, या सगळ्याचं वेगळेपण जाणवू लागतं.  मित्रांच्या संगतीत बिनधास्तपणे मनातले विचार ‘शेअर’ करण्याची…अर्थात व्यक्त होण्याची!
याच दरम्यान समानता, स्पर्धा, स्वदेश यांविषयीची बीजं मनात रूजायला लागतात. वेळ देणं, वेळ पाळणं याचं महत्त्व कळायला लागतं. हीच वेळ असते समाजरंगात रंगून जाण्याची!  याचवेळी स्वप्नांना पंख फुटायला लागतात. नव्या योजना आकार घ्यायला लागतात. नेमकी हीच संधी साधून कला, छंद खुणावू लागतात. या संग्रहातल्या कथा म्हणजे तुमच्या विचारलहरींचा आरसा आहे.