नियोजन कौशल्य

50.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book:. नियोजन कौशल्य snipet.pdf

कोणताही कार्यक्रम – उपक्रम यशस्वी अन्‌ परिणामकारक होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता असते. असं नियोजन करायला शिकता येतं. आणि त्याला लागणारी कौशल्ये गुणसंपदा मिळवता येते, असा विश्वास शालेय विद्यार्थ्यांपासून सर्व वयोगटातील व्यक्तींना मिळवून देण्यासाठी, अनुभवांच्या आधारे लिहिलेेले हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल.

नियोजनाच्या विविध पायऱ्या, त्या-त्या पायरीवर करावा लागणारा विचार व त्याचे बारकावे, त्यासाठी लागणारी कौशल्ये आणि गुणसंपदा याची सोदाहरण, सविस्तर मांडणी शालेय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकात केली आहे. त्याच्या सरावासाठी काही कृतिपाठ दिले आहेत.

विद्यार्थ्यांनी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांची जबाबदारी घ्यावी व ते कार्यक्रम उत्तमरितीने पार पाडण्यासाठी नियोजन कौशल्य आत्मसात करावे, योजकतेच्या पाऊलवाटेवर आत्मविश्वासाने चालायला सुरुवात करावी आणि त्यातून नेतृत्वाची पायाभरणी व्हावी यासाठी या पुस्तकाची त्यांना मदत होईल असा विश्वास वाटतो. विद्यार्थ्यांप्रमाणेच युवक-युवती, शिक्षक व संयोजक यांनाही हे पुस्तक निश्चितच उपयुक्त होईल.