अन पारिजातक हसला

100.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book:Bandista Mukta Shikshan ( 19.4.2021)

 

 

शिक्षण म्हणजे वर्गखोल्या, शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तके, शिक्षण म्हणजे खाजगी वर्ग, या साऱ्या चौकटी कोरोनाने मोडीत काढल्या. वर्षभरात शिक्षणाची साधने बदलली. पद्धती बदलली. संचारबंदीचा कालखंड शिक्षणक्षेत्रासाठी सर्वार्थाने परिवर्तनाचा कालखंड ठरला. ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रातील पूर्व माध्यमिक विभागही यास अपवाद नव्हता. प्रस्तुत पुस्तकातून सद्य परिस्थितीत विद्यार्थ्याचे कुटुंब, त्याचे घर व त्याच्या घराभोवतालचा परिसर या ठिकाणांचा कल्पकतेने केलेला वापर व त्यातून विद्यार्थ्यांचे झालेले अनुभव शिक्षण याची अनेक उदाहरणे वाचायला मिळतील. औपचारिक व अनौपचारिक शिक्षणात कार्यरत सर्वच अध्यापक, युवक-युवती कार्यकर्ते व पालक यांना या पुस्तकातील कल्पना प्रत्यक्ष राबवता येतील आणि राबवताना नवीन कल्पना सहजच स्फुरतील असा विश्वास वाटतो